रंगली नात्यांची सुरेल दास्तान !
पुणे ः
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ मरासिम’ -बंधन, नाते.. दोस्ताना ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १०० वा कार्यक्रम होता .ही
शतक महोत्सवी संगीतमय संध्याकाळ उत्तरोत्तर रंगत गेली.
शुक्रवार, १४ फेब्रवारी २०२० रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.
‘गोल्डन मेमरिज’ प्रस्तुत या कार्यक्रमात रोमँटिक हिंदी गीत, संगीत , गझल पेश करण्यात आल्या.
चैत्राली अभ्यंकर, हेमंत वाळूंजकर ( गायन ),केदार परांजपे (की बोर्ड), प्रसन्न बाम (हार्मोनियम), राजेंद्र हसबनीस (तबला), अभय इंगळे (वेस्टर्न रिदम) यांनी ही मैफल रंगवली. डॉ. मानसी अरकडी यांनी सूत्र संचालन केले.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.
मरासिम म्हणजे बंधन, नाते, दोस्ताना असा अर्थ आहे. ‘व्हॅलेंटाईन डे ‘ च्या सायंकाळी हिंदी रोमँटिक गीते, गझल, युगलगीते यांचा दोस्ताना या कार्यक्रमात हळुवारपणे उलगडत गेला. अभिनेत्री मधुबाला यांच्या जन्मदिनानिमित्त ‘ये जिंदगी उसी की है ‘, ‘ ये राते, ये मोसम, नदी का किनारा ‘ अशी गीते सादर करण्यात आली. ‘ झुकी झुकी सी नजर ‘, ‘ तुमको देखा, तो यह खयाल आया ‘ अशा गझलही सादर करण्यात आल्या