अनधिकृत बांधकामे, भाडेतत्वावरील भूखंडांची माहिती देण्याची लोकजनशक्ती पार्टी ची पीएमआरडीए कडे मागणी
१५ दिवसात आंदोलनाचा इशारा
पुणे:भाडेतत्वावर देण्यात येणारे भूखंड, भाडे तत्वावर दिलेले भुखंड व अनधिकृत बांधकामाची तपशिलवार यादी अशा स्वरूपाची माहिती मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने १५ दिवसात ही माहिती उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा आज लोकजनशक्ती पार्टी चे पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांनी दिला.या मागणीचे निवेदन त्यांनी पी एम आर डी ए कार्यालयात आज २९ जानेवारी रोजी दिले.
पीएमआरडीए चे अधिकारी ,कर्मचारी यांनी नागरिकांची सनद नागरिकांसाठी कार्यालयात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, नागरीकांची दिशाभुल करण्याचे मार्गदर्शन करतात व पीएमआर डिएच्या वेबसाइटवर माहिती पहा असे म्हणतात, नागरिकानी संगणकावर पाहिले तर जी माहिती पाहिजे ती मिळत नाही. अनधिकृत बांधकामांची तपशिलवार यादी ,भाडेतत्वावर दिलेल्या व देण्यात येणाऱ्या भूखंडांची माहिती पीएमआरडीए वेबसाईटवर देण्यात आलेली नाही.
या कार्यालयातील कर्मचारी वर्ग माहिती देण्यास टाळा टाळ करतात व माहिती अधिकाराखाली अर्ज दाखल केल्यानंतरही पत्रव्यवहार करण्याचे साधे सौजन्य ही दाखवत नाहीत. १५दिवसात अनधिकृत बांधकामांची तपशिलवार यादी , भाडेतत्वावर दिलेल्या व देण्यात येणाऱ्या भूखंडाची माहिती देण्यात यावी,अन्यथा जन आदोलन करण्यात येईल , असा इशारा रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी चे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.