दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून कात्रज येथे ब्लॅंकेट वाटप जनसेवा अनाथगृहात दंत तपासणी शिबीर
पुणे :
एम. ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून जनसेवा फाउंडेशनच्या अनाथगृह(कात्रज) येथे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
तसेच दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.उपमहापौर सरस्वती शेंडगे,डॉ विनोद शहा, रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे कुलसचिव ए. आर. शेख,डॉ. समीर जाधव,डॉ. रश्मी हेगडे,डॉ.शेल गुप्ता,डॉ. सफा सुर्वे, डॉ.रजत शेख,श्रुती बियाणी,विद्यार्थी,प्राद्यापक उपस्थित होते.