महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त १o हजार विद्यार्थ्याची अभिवादन मिरवणूक
जिवंत देखाव्यात दिसले ‘शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करणारे फुले दांपत्य
पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीदिनानिमित्त दहा हजार विद्यार्थ्यांची भव्य अभिवादन मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले.
“दुष्काळात शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करणारे फुले दांपत्य आणि फातिमाबी शेख ” असा जिवंत देखावा मिरवणुकीत सादर करण्यात आला होता. अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १७ वे वर्ष होते.
चार रिक्षातून महात्मा फुले यांचे संदेश ध्वनीक्षेपका द्वारे दिले जात होते. महात्मा फुले, सावित्री बाई फुले यांच्या वेशातील विद्यार्थी घोडा बग्गी मध्ये विराजमान झाले होते. ही मिरवणूक दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता आझम कॅम्पस येथून निघाली.
संस्थेच्या सर्व संस्थातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यामध्ये सहभागी झाले. जिवंत देखावा स्कूल ऑफ आर्ट्स च्या विद्यार्थ्यांनी सादर केला.अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थी महात्मा फुले , सावित्रीबाई फुले यांच्या वेशात सहभागी झाले.’ सत्य सर्वांचे आदीघर, सत्य सर्व धर्माचे माहेर,सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधःकार ‘ असे संदेश असलेले फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. संस्थेच्या ३० आस्थापनांमधील 10 हजार विद्यार्थी अभिवादन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले.
मिरवणुकीचा मार्ग आझम कॅम्पस, पूना कॉलेज, गोल्डन ज्युब्ली, काशीवाडी, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बब्बनमियाँ चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक, महात्मा फुले वाडा असा होता.लतीफ मगदूम ,शाहीद इनामदार ,वाहिद बियाबानी ,प्राचार्य डॉ शैला बूटवाला ,शाहीद मुनीर शेख ,प्राचार्य डॉ किरण भिसे ,अब्दुल वहाब ,प्राचार्य डॉ व्ही एन जगताप ,परवीन शेख ,मौलाना कासमी ,आयेशा शेख ,हेमा जैन,मश्कुर अहमद शेख ,रबाब खान ,रुबिना शहा,मजीद सय्यद ,गफार सय्यद ,गुलजार शेख ,महमद हनीफ शेख ,डॉ ऋषी आचार्य ,सिकंदर पटेल सहभागी झाले .
दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. गांधी,महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.