पुण्यात संविधान परिषद आणि सम्यक पुरस्कार गौरव सोहळा
‘सम्यक पुरस्कार समिती’ तर्फे आयोजन
पुणे:’सम्यक पुरस्कार समिती’ तर्फे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी आणि संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ सम्यक पुरस्कार समिती ‘चे संस्थापक नागेश भारत भोसले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
अॅड. शारदा वाडेकर, तुषार काकडे, शैलेंद्र चव्हाण, विकास सातारकर, संदिप बर्वे,डॉ. संजय सोनेकर, दत्ता जाधव, संजय आल्हाट, रोहिनी टेकाळे, प्रा. दादाराव इंगळे यांना सम्यक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह,महात्मा फुले पेठ, टिंबर मार्केट(पुणे) येथे मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०१२,सायंकाळी ४ वा.ही परिषद होणार आहे .
वसंतराव साळवे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत तर अंकल (यादवराव) सोनवणे हे उढ्घाटक तर अॅड. किरण कदम हे स्वागताध्यक्ष असणार आहेत . युवा लेखक श्रीरंजन आवटे , युवक क्रांती दल चे राज्य संघटक जांबूवंत मनोहर, दलित युवक आंदोलन चे संस्थापक सचिन बगाडे हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून त्यात आनंद वैराट,दिपक (आण्णा) गायकवाड,संतोष (आंबा) सुरते राजेंद्र चौधरी,अमोल (सोनू) काशिद,आनंद शिंदे यांचा समावेश आहे .