चुकीचे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
पुणे:’एक वर्षापूर्वी हृदयरोगाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या उपचारात हेळसांड झाल्याचा आरोप करून नुकसानभरपाईच्या नावाखाली भरमसाठ पैशांची मागणी डॉ दीपक शिंदे (आधार हॉस्पिटल) यांच्याकडे करणाऱ्या आणि खोटा गुन्हा दाखल करणार्या काशिनाथ तळेकर या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी’ या मागणीसाठी डॉ. दीपक शिंदे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ सप्टेबर पासून आमरण उपोषण सुरु असताना डॉक्टर संघटनांनी एकत्रितपणे आज त्यांची भेट घेवून पाठींबा दिला .डॉ दीपक शिंदे आणि डॉक्टर्स संघटनांना २४ सप्टेबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बोलावून घेवून चर्चा केली आणि कारवाई करण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडून माहिती घेवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
कारवाई होईपर्यंत उपोषण सुरु ठेवणार असल्याचे डॉ दीपक शिंदे यांनी यावेळी सांगितले
डॉक्टर असोसिएशन चे पदाधिकारी ,राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेल चे पुणे अध्यक्ष डॉ सुनील जगताप ,डॉ मंदार रानडे (न्याय वैद्यकीय सल्लागार ) ,डॉ संतोष पवार (पीडीए -पुणे डॉक्टर्स असोसिएशन ) ,डॉ मंगेश खटावकर (सिंहगड रोड डॉक्टर्स असोसिएशन ),डॉ राजेंद्र खेडेकर ,डॉ मुश्ताक मुकादम, डॉ महेश शिंदे,डॉ अनिता मुनोत ,डॉ विजय मुनोत,डॉ आदित्य पाटील,डॉ प्रताप ठुबे ,डॉ राहुल सूर्यवंशी .डॉ अजित पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते
डॉ शिंदे का उपोषण करीत आहेत ?
वर्षभरापूर्वी घडलेल्या गणेश गोरे या रुग्णाच्या मृत्युच्या घटनेसंदर्भात आधार हॉस्पिटलवर निवृत्त पोलीस उपअधीक्षक काशिनाथ तळेकर यांनी आठवड्यापूर्वी खोटा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयाची आणि डॉ. दीपक शिंदे यांची बदनामी तसेच गैरसमज वाढत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी डॉ. दिपक शिंदे यांनी २३ सप्टेबर रोजी पत्रकार परिषदेत केली.
त्यांच्या या मागणीला एम सी आय एम चे अध्यक्ष डॉ आशुतोष गुप्ता,जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या डॉ. संगीता खेनट, एनसीपी डॉक्टर सेल,पुणे डॉक्टर्स असोसिएशन, डॉ राजेंद्र खेडेकर अध्यक्ष-ज्ञानयोग सेवा ट्रस्ट,डॉ मंदार रानडे -न्याय वैद्यकीय सल्लागार,डॉक्टर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, वारजे डॉक्टर्स,राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेल चे डॉ सुनील जगताप,डॉ रवींद्र काटकर,पी डी ए डॉक्टर असोसिएशन चे डॉ संतोष पवार,डॉ संभाजी कारंडे,पी एसआर डी ए पुणे सिहगड रोड डॉक्टर असोसिएशन चे डॉ मंगेश खटावकर,डॉ आसावरी पाटील,इंडियन मेडिकल असोसिएशन चे डॉ संजय पाटील,डॉ संजय नवरंगे,वारजे डॉक्टर असोसिएशन यांचा पाठिंबा असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. परिषदेला डॉ. महेश दरेकर, डॉ अभिनंदन बुद्रुक उपस्थित होते.