‘पी.ए. इनामदार इन्स्टिट्यूट ऑफ इम्फर्मेशन टेक्नोलॉजी’ संस्थेची स्थापना
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी.ए. इनामदार इन्स्टिट्यूट ऑफ इम्फर्मेशन टेक्नोलॉजी(पै .आय . आय.टी.) ‘ संस्थेची स्थापना करण्यात आली.
आझम कॅम्पस ( पुणे कॅम्प ) अलीकडेच हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी डॉ.पी. ए. इनामदार होते. संस्थेचे सहसचिव इरफान शेख, आय स्क्वेअर आय.टी. कंपनीचे कार्पोरेट रिलेशन्स विभागाचे प्रमुख आदेश पटवर्धन , सिटीज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षद सांगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.