भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये ‘आंत्रप्रुनरशिप स्किल डेव्हेलपमेंट प्रोग्रॅम ‘
पुणे :भारती विद्यापीठ ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (‘आयएमईडी‘ ) मध्ये ‘आंत्रप्रुनरशिप स्किल डेव्हेलपमेंट प्रोग्रॅम ‘ आयोजित करण्यात आला होता . प्रोविजडम प्रा. लि . चे संस्थापक पुनीत रामन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . आयएमईडी चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर अध्यक्षस्थानी होते . डॉ भारती जाधव यांनी संयोजन केले . दीक्षा श्रीवास्तव ,अनू शेकोकर ,जन्मेजय कुमार ,अमर चौधरी आणि ८० विद्यार्थी उपस्थित होते . हा कार्यक्रम २५ ऑगस्ट रोजी पौड रस्ता कॅम्पस येथे झाला