क्रांती दिन व युवक क्रांती दल स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबीर
पुणे:क्रांती दिन व युवक क्रांती दल स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले एफएम वाहिनीवरचे लोकप्रिय आरजे संग्राम यांची प्रमुख उपस्थिती होती
शुक्रवार, दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी, सायंकाळी ४ ते ९ या वेळेत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधी भवन ) कोथरूड येथे हे शिबीर झाले . महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल,रक्ताचे नाते ट्रस्ट या संस्थांनी संयुक्तपणे आयोजन केले . युक्रांद चे शहराध्यक्ष सचिन पांडुळे ,सुदर्शन चखाले, संघटक ऋतुजा पुकाळे यांनी स्वागत केले .
डॉ प्रवीण सप्तर्षी ,अन्वर राजन ,संदीप बर्वे ,अभिजित मंगल इत्यादी उपस्थित होते .