आषाढी एकादशी निमित्त ‘तुका म्हणे’ आणि ‘वैकुंठ नायका ‘ रंगनृत्य आविष्कार
पुणे :आषाढी एकादशी निमित्त संत तुकारामांच्या अभंगावर आधारित ‘तुका म्हणे’ हा रंगनृत्य आविष्कार ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे . रविवार दि ७ जुलै सकाळी ९ ४५ वाजता
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड, पुणे) येथे हा कार्यक्रम होणार आहे .संकल्पना दिग्दर्शन अरुंधती पटवर्धन, कल्याणी काणे यांची आहे . याचबरोबर संत ज्ञानेश्वर, चोखामेळा, नरहरी सोनार, नामदेव,तुकाराम या संतांच्या अभंग रचनांचा नृत्याविष्कार ‘संत सेवा संघ’ आणि नीलिमा नृत्यालय तर्फे ‘वैकुंठ नायका ‘ या नावाने याच कार्यक्रमात सादर केला जाणार आहे. ‘वैकुंठ नायका ‘ला संगीत जीवन धर्माधिकारी यांचे आहे .