पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार , नगरसेविका पूजा आनंद, रचना पाटील, प्रा. गुंडे, शैलेंद्र पटेल ( वसुंधरा सामाजिक अभियान ),अजित कुमठेकर ,अर्जुन जगताप ,मुक्ता जगताप , अनंत घरत ( माय अर्थ फाऊंडेशन )तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या अभिनव उपक्रमात सहभागी झाले. पुणेकरांनी मोबाईल कॅमेऱ्यात या उपक्रमाचे चित्रीकरण केले . ‘सोशल मीडियाद्वारे पुणेकरांनी जलबचतीचा हा संदेश व्हायरल करावा . होळी आणि धुळवडीला पाण्याची बचत करावी ‘असे आवाहन ‘पूना गेस्ट हाऊस ‘चे संचालक किशोर सरपोतदार यांनी केले . कल्याणीनगर ,खराडी ,विमान नगर या ठिकाणी हे जनजागृतीपर भरतनाट्यम सादरीकरण रविवारी सकाळी होणार आहे .
‘जल होश ‘ :होळी-धुळवडीला पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी पुण्यात भरतनाट्यमद्वारे जनजागृती
अनिता नेवे’ज नृत्यपूजा एकेडमी ‘ च्या उपक्रमाला पुणेकरांचा प्रतिसाद !
पुणे :होळी,धुळवड सणाच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी पुण्याच्या रस्ते ,चौक आणि प्रमुख ठिकाणी भरतनाट्यमद्वारे जनजागृती करणारा ‘जल होश ‘ हा अभिनव उपक्रम ‘अनिता नेवे’ज नृत्यपूजा एकेडमी ‘ तर्फे १६ मार्च रोजी पुण्यातील रस्त्यांवर ,चौकात आणि ऐतिहासिक प्रमुख ठिकाणी आयोजित करण्यात आला होता .
‘होळी,धुळवडीचा सण २० मार्च रोजी असल्याने त्यापूर्वी ही जनजागृती पुणेकरांमध्ये केली .मानवी जीवनातील पाण्याचे महत्व विविध नृत्यमुद्रांद्वारे सादर करण्यात आले ‘ ,अशी माहिती एकेडमीच्या संचालक अनिता नेवे यांनी दिली .
पुण्यातील ‘अनिता नेवे’ज नृत्यपूजा एकेडमी ‘ ने हा उपक्रम १६ मार्च रोजी पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर प्रथमच आयोजित केला . युवा कलाकारांद्वारे जनजागृतीपर भरतनाट्यम सादरीकरण केले .या उपक्रमादरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,फर्गसन रस्ता ,बालगंधर्व रंगमंदिर प्रवेशद्वार ,शनिवारवाडा ,कर्वे पुतळा कोथरूड येथे शनिवारी सादरीकरण करण्यात आले . पाणीबचतीचा संदेश फलक घेऊन अनेक स्वयंसेवक सहभागी झाले .
पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले. पाणी बचतीचे आवाहन केले .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे कुलगुरू नितीन करमाळकर यांनी कलाकारांची भेट घेऊन उपक्रमाचे स्वागत केले.विद्यापीठातील कार्यक्रमात ३०० विद्यार्थी सहभागी झाले .बालगंधर्व,डेक्कन पोलीस चौकीचे पोलीस या मोहिमेत सहभागी झाले तर शनिवारवाडा येथे परदेशी पर्यटकांनी या आगळ्या वेगळ्या जनजागृती मोहिमेची माहिती घेतली .