‘पै कॉलेज ऑफ वेदा ‘ मध्ये कलोत्सव- २०१९ ला प्रारंभ
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ वेदा ‘ मध्ये कलोत्सव- २०१९ ला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ दीपक टिळक यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावे ळी सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सहसचिव इरफान शेख ,प्राचार्य ऋषी आचार्य ,हर्षद सांगळे , उपस्थित होते .
. ‘कॉफी विथ कॉलेज ‘,’अनिमेशन पिचिंग ,थ्री -डी कॅरॅक्टर मॉडेलिंग ,पबजी -लाईव्ह डेमो ,ग्रुप डान्स ,खेळ ,चित्रपट महोत्सव ,शॉर्ट फिल्म महोत्सव असे अनेक उपक्रम आयोजित केल्याची माहिती प्राचार्य डॉ . ऋषी आचार्य यांनी दिली .
हा कलोत्सव २४ जानेवारी रोजी सुरु झाला आणि ३० जानेवारी पर्यंत चालणार आहे . विविध स्पर्धांमधून १ लाखाची पारितोषिके विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत .