बक्षीस समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान लेखक आनंद घैसास, ‘वनराई’ चे अध्यक्ष रवींद्र धारिया, रोटरी (३१३१)चे माजी प्रांतपाल श्री. प्रशांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गर्शन केले.
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या सदर निबंधांपैकी निवडक निबंधाचे सादरीकरण स्पर्धकांनी या संमेलनात केले . ह्यातील निवडक विद्यार्थ्यांना एकूण 4 लाख रुपयांची शिष्यवृत्ती ह्या स्पर्धेच्या निमित्ताने स्कायसायक्यु संस्थेने दिली.
‘पक्षी संवर्धन ‘ शोधनिबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
पुणे :शैक्षणिक- सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या स्कायसायक्यू (SkySciQ) , रोटरी क्लब ऑफ पुणे पौड रोड आणि भोर राजगड, वनराई, 95 बिग एफएम, इत्यादी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘पक्षी संवर्धन ‘ शोध निबंध स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ स्काऊट गाईड प्रशिक्षण केंद्र, भोर येथे संपन्न झाला.
किलबिल संमेलन मध्ये हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता .
महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून हजारो निसर्गप्रेमी विद्यार्थी आणि शिक्षकांचा उपक्रमास उत्तम प्रतिसाद लाभला असल्याची माहिती संस्था प्रमुख श्रीमती दीप्ती मोहन पुजारी यांनी दिली .
ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ गिरीश जठार, डॉ संजीव नलावडे यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील करिअर संधी ह्या विषयावर, तज्ज्ञ मंडळींचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिग एफएम चे एम जे बंड्या यांनी केले. हा चर्चासत्राचा कार्यक्रम सर्व पक्षीप्रेमींसाठी खुला होता.