ग्रामीण विद्यार्थ्यांना ५० लाख किमतीच्या जीवनोपयोगी साहित्याचे वितरण
कडूस (ता. खेड ) येथे खास सोहळा
पुणे :’रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन ‘च्या वतीने १००५ ग्रामीण विद्यार्थ्यांना एकूण ५० लाख किमतीच्या जीवनोपयोगी आणि शिक्षणोपयोगी साहित्याचे वितरण रविवार, ८ डिसेंबर रोजी करण्यात आले .
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन,रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट ,’स्कॉ ‘ कॅनडा ही संस्था यांच्या संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले .
या जीवनोपयोगी साहित्याच्या संचात कपडे ,शैक्षणिक साहित्य ,झोपण्याचे साहित्य (स्लीपिंग किट ),दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचा समावेश आहे .
या कार्य्रक्रमात देसाई रुग्णालयातर्फे विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली .
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन चे माजी अध्यक्ष आणि या प्रकल्पाचे समन्वयक शैलेश गांधी ,पंकज आपटे ,अमृता देवगावकर ,बिनायक चौधरी ,समीर रुपाणी तसेच ‘ स्कॉ’ कॅनडा संस्थेचे ख्रीस हिल्स , सरपंच जयश्री नेहरे या कार्यक्रमाला उपस्थित होते.१९७० साली या सामाजिक उपक्रमाला सुरुवात झाली . कॅनडातील सामाजिक संस्था या उपक्रमाला मदत करत आले आहेत .