पुणे-निवडणुकीत अखेरच्या आठवड्यात भाजपाने फोड़ा फोड़ी चे तंत्र पुण्यात आज वेगाने केल्याचे दिसून आले. विमानतळावर मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत रात्री साडेनवू वाजता गळ्यात कमळ चिन्ह असलेली उपरणे घालून सुधीर जानज्योत आणि सदानंद शेट्टी यांना भाजपा मध्ये प्रवेश दिला गेल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस मध्ये असताना जानज्योत यांनी शिक्षण मंडळ अध्यक्ष आणि नगरसेवक पद भूषविले आहे तर शेट्टी यांनी स्थायी समिति अध्यक्षपद भूषविले आहे. कैंटोनमेंट मतदार संघात काँग्रेसचे रमेश बागवे यांचे वाढते प्राबल्य कमी करण्यासाठी ही राजकीय खेळी आयत्यावेळी केल्याचे सांगितले जाते आहे.यासमयी खासदार संजय काकडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते. एकीकडे शेट्टी यांच्या पत्नी काँग्रेस च्या नगरसेविका सुजाता या काँग्रेस चे उमेदवार बागवे यांच्या प्रचार फेरीत फिरत असताना दुसरीकडे शेट्टी यांनी आपल्या गळ्यात भाजपचे उपरणे घालून प्रवेश केल्याचे दिसले आहे .
ततपुर्वी विमानतळ येथे मुख्य मंत्री यांची भेट घेवून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी मंत्री स्व. चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहु बालवडकर, समाधान शिंदे, तुकाराम जाधव, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा समावेश होता.