पुणे दि. १ फेब्रुवारी – पोलिसांवर वारंवार होणारे हल्ले ही राज्याच्या दृष्टीने लज्जास्पद बाब आहे. पोलीस जनतेचं संरक्षण करतात, पण तेच पोलिस आज असुरक्षित आहेत. भविष्यात पोलिसांवरील भ्याड हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला. ड्युटीवर असणारे पोलिस शिपाई रवींद्र करवंदे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडल्यानतंर दरेकर यांनी आज तातडीने पुणे येथे जाऊन त्यांची भेट घेतली त्या प्रसंगी त्यांनी हा इशारा दिला.
पुणे शहरात कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादातून दोन अज्ञात व्यक्तीनी ड्युटीवर असलेले वाहतूक विभागातील पोलिस शिपाई रवींद्र करवंदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने रविवारी हल्ला केला. या हल्यामध्ये जखमी झालेले पोलिस शिपाई करवंदे यांच्यावर पुणे येथील कासरवाडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.दरेकर यांनी आज त्यांची रूग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेतली व प्रकृतीची विचारपुस केली. त्याच्यावर योग्य पध्दतीने उपचार करण्याच्या सुचना दरेकर यांनी रूग्णालयातील डॉक्टरांना दिले तसेच त्यांच्या कुंटुबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी दरेकर माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, “ जखमी पोलीस करवंदे यांना आज भेटलो आणि चौकशी केली. तसेच डॉक्टरांशी चर्चा केली असून त्यांना गंभीर इजा झाली आहे. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु पोलिसांवर वारंवार हल्ले होत आहेत ही गांभीर्याने घेण्याची बाब आहे, असे दरेकर यांनी सागितले.
“करोनाकाळात जमावाने पोलिसांवर हल्ला होत असले तरी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारचा आहे. त्यामुळे सरकारला सांगण्याची वेळ आली आहे की पोलिसांची काळजी घ्या असा टोला दरेकर यांनी लगावला.