पुणे- केंद्रीय राज्य मंत्र्याच्या मुलाच्याकडून झालेल्या लखीमपुर खेरी येथील शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या घटनेबद्दल महाविकास आघाडीने पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंद च्या अनुषंगाने आज सकाळी सकाळी ६ वाजता कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी स्वारगेट येथे पीएमपीएमएल च्या डेपोतून बाहेर जाणाऱ्या बसेस अडवून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली . रविंद्र धंगेकर,संजय बालगुडे , दत्ता सागरे ,भाऊ करपे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ,त्यांनी प्रथम पीएमपीएमएल च्या कामगारांशी चराच हि केली .