पुणे- वाढती खाजगी वाहने ,आणि उग्र होत चाललेली वाहतूक समस्येचा महापूर रोखण्याच्या उद्देशाने पीएमपीएमएल ची बस सेवा आता कात टाकू पाहते आहे. गरीबातल्या गरिबा पासून ते अलिशान मोटारी वापरणाऱ्यांना देखील आकर्षित करेल अशी अद्यावत बस सेवा देण्याच्या प्रयत्नांना आता सुरुवात झाली आहे असे वाटावे अशी सुरुवात आता होते आहे .याच पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेसचे नगरसेवक आणि माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी आपल्या प्रभागात पहिल्या पाच स्मार्ट बस स्थानकांचे उद्घाटन कॉंग्रेसचे नेते माजी आमदार मोहन जोशी ,पीएमपीएमएल चे मुख्य कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप ,नगरसेवक अजित दरेकर, मेहबूब नदाफ यांच्या प्रमुख उपस्थितीत केले.
महिला सुरक्षा , रुगणालये, पोलीस ,सार्वजनिक सुविधांची माहिती या सर्व बाबींची दक्षता घेऊन हि बस स्थानके उभारण्यात आली आहेत . आगामी काळात मेट्रो आणि खाजगी वाहनांच्या स्पर्धेला सामोरे जाऊन पीएमपीएमएल ची बस सेवा उभारण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर या उद्घाटन समयी केलेला हा छोटासा व्हिडीओ रिपोर्ट …पहा यावेळी कोण काय म्हणाले …