पुणे-राजकीय स्पर्धक असलेल्यांचे पाय खेचण्याच्या राजकारणाची उघड होवू नये ती झलक आज महापालिकेच्या मुख्य सभागृहात उघड झाली .आणि आणि या राजकारणाचा फटका तब्बल तीन महारथींना बसल्याचा प्रत्यय आज आला . माजी महापौर दत्ता धनकवड़े, माजी विपक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेसचे अविनाश बागवे या तिघांना अर्थसंकल्पावर बोलण्याचा अधिकार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ‘पक्षनेत्यांचे ठरलेय’असे सांगत चक्क नाकारला.
या … अभ्यासू समजल्या जाणाऱ्या नगरसेवकांना डावलल्याने यावेळी जोरदार खडाजंगी झाली .आणि या खडाजंगी ला पूर्ण विराम देण्यासाठी महापौरांनी दिलेला आदेश एम आय एम च्या नगरसेविकेने तत्परतेने अंमलात आणून गोंधळ सुरु असताना हि आपले भाषण सुरु केले . आणि गोंधळ संपल्यावरच या नगरसेविकेने भाषण देखील संपविले .
हे तिन्ही ज्येष्ठ नगरसेवक आज तिसर्या दिवशी सभागृहात आले होते . मात्र काल सायंकाळी आमचे पक्षनेत्यांचे बोलणे झाले आहे त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या नुसारच मी सभा चालवीत आहे. आणि सदस्यांना बोलण्याची अनुमती देतो आहे. मी माझ्या मनाप्रमाणे काही करत नाही असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट करत कॉग्रेसच्या अविनाश बागवे आणि राष्ट्रवादीच्या दत्ता धनकवडे व दिलीप बराटे यांना अर्थसंकल्पावर बोलण्याची परवानगी देण्यास त्यांनी नकार दिला आणि एम आय एम च्या लांडगे यांना तुम्ही भाषण सुरु करा म्हणजे इतरांचे माईक बंद होतील असे सांगून त्यांना भाषण प्रारंभ करण्यास सांगितले . त्यांनीही या सर्व गोंधळात भाषण केले .
महापौरांनी आपली भूमिका सरळपणे स्पष्ट केल्याने पक्षनेत्यांचे आपसातील धोरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दरम्यान स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असलेले सदानंद शेट्टी विधानसभा निवडणूक काळात भाजपमध्ये गेले त्यांच्या सौभाग्यवती आणि
काँग्रेसच्या नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांना मात्र कालच भाषणाची परवानगी देण्यात आली त्यांनी भाषणही केले आणि आज कॉंग्रेसचे स्वीकृत सदस्य अजित दरेकर यांना भाषणाची परवानगी दिली गेली आणि अविनाश बागवे यांना मात्र आजही परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर बागवे आणि महापौर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली . यावेळी पक्षनेते तुमचे सभासद तुम्ही सांभाळा असेहि महापौर यांनी स्पष्ट सांगितले.तर माजी महापौर असलेले धनकवडे आणि नुकतेच माजी बनलेले विपक्ष नेते, माजी उपमहापौर दिलीप बराटे यांचा यावेळी महापौरांशी शाब्दिक वाद विवाद झाला आणि या निर्णयाचा या दोघांना हि धक्का बसला .
काय कसे झाले ते व्हिडीओत पहा .. ….