पुणे- महापालिकेची मागील महिन्यातील सर्व मुख्यसभा कोरोना च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महापौरांवर विसंबून महापौरांना अधिकार देऊन तहकूब करण्यात आल्या .
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/1303442749867071/
या महिन्यातील पहिली मुख्यसभा आज सुरु होताच भाजप व्यतरिक्त अन्य पक्षांच्या सदस्यांनी आणि नेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका करत असलेल्या उपाय योजनांची माहिती आणि अर्थसंकल्पाची स्थिती याबाबत माहिती द्यावी अशी मागणी केली . मात्र ती न देताच ,अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात कामे करू द्यात ,मुख्य सभेच्या कारणाने तास न तास इथे अडकवून ठेवू नये अशी भूमिका घेत आणि या महिन्यात निधन पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून सभेची तहकुबी सभागृहनेते यांनी मांडली आणि ती महापौरांनी स्वीकारून सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले . त्यानंतर सभागृहनेत्यांनी उद्याची आणि या महिन्यातील सभाही तहकूब करण्याचे अधिकार महापौरांना द्यावेत असे सांगितले यावर कॉंग्रेसचे अरविंद शिंदे, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आणि दिली बराटे , योगेश ससाणे ,भैय्यासाहेब जाधव ,गफूर खान पठाण यांनी आक्षेप घेतले . गेल्या महिन्यात अधिकार दिले . पण स्थायी समिती च्या सभा मात्र महापौर सुरु ठेवत आहेत . त्या कशा ठेवतात ,त्यांना कोरोनाचे संकट लागू होत नाही काय ? कि निव्वळ टेंडर पास करायचे आणि आर्थिक व्यवहार आहेत म्हणून जर त्या सुरु ठेवण्यात येतात काय ? असे प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी तर मुख्य सभा हि होऊ द्यात इथे सोशल डीस्टन्स पाळून निव्वळ कोरोना वर तरी माहिती द्या . काय करतोय आपण ते कळू द्यात . अशी भूमिका घेतली अखेरीस पक्षनेत्यांनी महापौरांना पुढील सभा तहकुबीचे अधिकार दिले परंतु सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी काम करावे असा आपला निर्णय असल्याकचे स्पष्ट केले . या महिन्यातील पुढील सर्व मुख्य सभा देखील यानंतर महापौरांनी तहकूब केल्या. आता जून महिन्यातच मुख्य सभा होणार आहे .