पुणे- कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आणखी काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी एका आदेशान्वये कळविले आहे.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाची 69 प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासह सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. केवळ दवाखाने सुरू ठेवण्यास सांगितले आहे.
तर, ज्या भागांत कोरोना चा जास्त प्रभाव नाही अशा ठिकाणी12 तास दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी कोणती दुकाने सुरू करावीत याबाबत आतयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
दुकाने सुरू करताना फिजिकली डिस्टन्स ,मास्क,इत्यादी सूचनांचे पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे.
इस्त्री, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणारे कच्चा मालाचा पुरवठा करणारे व्यवसाय, वाहन दुरुस्ती, फर्निचर विक्री, गृह उपयोगी सामुग्री, फूट वेअर, बांधकाम साहित्य विक्री या दुकानांना आणखी काही दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.
ही दुकाने सुरु करण्यासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशी 12 तासांची वेळ ठरवून देण्यात आली आहे. या दुकानातील कामगार आणि दुकानमालक हे कोरोना नसलेल्या क्षेत्रातील असावे. दुकानांत काम करताना सुरक्षित अंतर ठेवावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायजरचा वापर करणे आवश्यक आहे. अशा अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक दिवशी सुरू राहणाऱ्या व्यवसायांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
- सोमवार – इस्त्री व लॉन्ड्री दुकान, स्टेशनरी दुकाने, वैद्यकीय साहित्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणारी दुकाने.
- मंगळवार- वाहन दुरूस्तीचे साहित्य, गृहपयोगी सामग्री, तयार फर्निचरची विक्री.
- बुधवार – इस्त्री व लॉन्ड्री दुकाने, फूटवेअर, स्टेशनरी तसेच वैद्यकीय साहित्यसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणारी दुकाने.
- गुरूवार – वाहन दुरूस्तीची साहित्य विक्री करणारी दुकाने. गृहपयोगी सामग्री, स्टेशनरी, तयार फर्निचरची दुकाने.
- शुक्रवार – इस्त्री व लॉन्ड्रीची दुकाने, फूटवेअर, बांधकाम साहित्य विक्रीची दुकाने, वैद्यकीय साहित्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणारी दुकाने.
- शनिवार – वाहन दुरस्तीचे साहित्य विक्री करणारी दुकाने, गृहपायेगी सामग्री, इस्त्री व लॉन्ड्री तसेच बांधकाम साहित्याची दुकाने, तयार फर्निचरची दुकाने.
- रविवार – वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री करणारी दुकाने,गृहपायोगी सामग्री, स्टेशनरी, फूटवेअर, बांधकार साहित्याची विक्री