पुणे- काँग्रेस चे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केलेल्या मागणी नुसार प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना आत व बाहेर जाता येत नसल्याने या परिसरातील नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने उद्यापासून घरोघरी मोफत मास्क व रेशन वितरित केले जाणार आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली.
नागरिकांना देण्यात येणाऱ्या रेशन किटमध्ये जीवनावश्यक वस्तू अर्थात साखर, पीठ, गोडेतेल, तूरडाळ, तांदूळ, पोहे, मीठ, साबण, मिरची पावडर, चहापावडर व दुधपावडर या जीवनावश्यक वस्तूंचा रेशन किट मध्ये समावेश आहे. प्रतिबंधित ६९ क्षेत्रातील सुमारे ७०,००० घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात येणार आहे.