कबड्डी च्या प्रसारासाठी ..पुण्याचे पाऊल पडणार पुढे ….(व्हिडीओ)
पुणे- पुणे तिथे काय उणे म्हणतात ..तशा नवनवीन संकल्पनांना इथे कमतरता नाही ..पण त्या राबविण्याची आणि देशभर सातत्याने पोहोचविण्याची कुणी तरी जबाबदारी घेतली पाहिजे .मराठी मातीतला खेळ कबड्डी ..हु तू तू तू … हा खेळ देशभर लोकप्रिय व्हावा असे पुणे महापालिकेतील शहर सुधारणा समितीला वाटते आहे .क्रिकेट साठी स्टेडीअंम होतात ,प्रशिक्षणांचे माहोल चालते तिथे कबड्डी साठी का विचार होवू नये ..कबड्डी सारखा दशकानुदशके मागे पडत चाललेला खेळ पुढे आणणे तसे जिकिरीचेच आहे. पण म्हणतात णा कुणी तरी सुरुवात तर करून पहावी ..तशी सुरुवात अगदी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी केली आहे. पुणे महापालिकेच्या वतीने कबड्डी चा संघ स्थापन करणारा प्रस्ताव त्यांनी या दिवशी संमत केला आहे . जो आता मुख्य सभे पुढे मांडला जाईल .
पुणे महापालिकेच्या हद्दीतून कबड्डी खेळणारे तरुण तरुणी निवडून त्यांच्यातून संघ करणे ,त्यांचा खेळ -कौशल्य तज्ञाच्या सहाय्याने विकसित करणे,त्यांना सर्व साठी मैदाने, साहित्य उपलब्ध करवून देणे अगदी मानधन देखील त्यांना सुरु ठेवणे अशा आशयाचा हा प्रस्ताव मारा भाषा दिनी महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने मंजूर केला आहे ..याबाबत पहा आणि ऐका नेमके समितीचे अध्यक्ष ,नगरसेवक अमोल बालवडकर यांनी काय म्हटले आहे…