पुणे -शहरातील जुने परवानाधारक स्टॉलधारक व्यावसायिक यांच्यावर अतिक्रमण कारवाई करू नका , तर त्यांचे पुनर्वसन करा अशी मागणी लक्ष्मी रोड सिटी पोस्ट येथील स्टॉलधारक संघटना यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली .माजी उपमहापौर दीपक मानकर ,माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे,भाऊ करपे यांच्या नेतृत्वाखाली स्टॉलधारक संघटनेने उपमुख्यमंत्र्यांना साकडे घातले .
याबाबत लक्ष्मी रोड सिटी पोस्ट स्टॉलधारक संघटनेचे नेते समीर शेख यांनी सांगितले कि , स्टॉलधारक विनाकारण त्रास दिला जातो त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो आहे . परवानाधारक त्यांचे परवाना शुल्क नियमितपणे भरतात , तरी देखील कारवाई होते , हि कारवाई थांबवली पाहिजे . तसेच , पूर्वी मासिक परवाना शुल्क हे २० रुपये होते . आता हे परवाना शुल्क दररोजचे ५० रुपये दयावे लागत आहे .
यावेळी लक्ष्मी रोड सिटी पोस्ट स्टालधारक जमीर शेख , इम्तियाज इनामदार , पृथ्वी येळवंडे , हनुमंत शिंदे , गुरुनाथ खुबा , दिलीप बुध्ददेव , इम्रान बागवान , इरबू तडकले , संदीप माशाळकर , अनिल कदम , अर्शद मुजावर व महेश इंदे आदी उपस्थित होते .