पुणे- भारतरत्न मौलाना अबुल कलम आझाद अर्थसहाय्य योजना (इ.१० वी) व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजनेच्या (इ.१२ वी) शिष्यवृत्तीचे एकूण ७८७९ विद्यार्थ्यांना एकूण १४ कोटी ८लाख ५ हजार रुपये महापौर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .(आर.टी.जी.एस. द्वारे पालकांच्या खात्यात जमा करण्यात आले. )
पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागामार्फत भारतरत्न मौलाना अबुल कलम आझाद अर्थसह्य्य योजना (इ.१० वी) व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना (इ.१२ वी) राबविण्यात येतात. पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ.१० वी व १२. वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ८०% पेक्षा जास्त गुण, पुणे महानगरपलिकेच्या शाळेत अथवा रात्र प्रशालेत शिकत असलेले विद्यार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ७०% पेक्षा जास्त गुण, तसेच ४०% अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी लाभासाठी पात्र ठरतात. पात्र विद्यार्थ्यांना इ.१० वी साठी १५०००/- व इ.१२ वी साठी २५०००/- पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते.
सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात मौलाना अबुल कलम आझाद अर्थसह्य्य योजना (इ.१० वी) ६९९० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी पात्र ठरलेल्या ५६१७ तर
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना (इ.१२ वी) २८७२विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी २२६२ विद्यार्थ्यांना म्हणजे
एकूण ९८६२विद्यार्थ्यामधून पात्र ठरलेल्या ७८७९ विद्याथ्यांना हि शिष्यवृत्ती देण्यात आली.
त्यामधील ७८७९ लाभार्थी पात्र झाले आहेत. पात्र लाभार्थ्यांना दि. ०६फेब्रुवारी २०२० रोजी महापौर मुरलीधर मोहोळ महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते एकूण रक्कम रुपये १४,०८,०५,०००/- आर.टी.जी.एस. (RTGS) करण्यात आले आहे. दि.०६फेब्रुवारी २०२० पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल. सदर कार्यक्रम प्रसंगी आमदार श्री.सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, अध्यक्ष स्थायी समिती हेमंत रासने, सभागृह नेता धीरज घाटे नगरसेवक सुशील मेंगडे,सुनील इंदलकर, समाज विकास विभाग अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापौर यांनी शिष्यवृत्ती प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, व या शिष्यवृत्तीच्या रकमेचा पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीच विनियोग करावा, असे आवाहन केले. पुढील आर्थिक वर्षात शिष्यवृत्तीचे वितरण वेळेत करण्याच्या व शिष्यावृतीच्या रकमेच्या विनियोगाची खातरजमा करण्याच्या सूचना महापौर यांनी या प्रसंगी प्रशासनाला दिल्या.