विशिष्ट अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक-पालिकेचा भ्र्ष्ट कारभार
पुणे-
येवलेवाडी गावच्या हद्दीतील बांधकामांबाबत महापालिकेकडे तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार नव्याने सुरू असलेल्या बांधकामांवर गुरुवारी दिवसभर कारवाई करण्यात आली. पुढील चार दिवस या भागांत कारवाई सुरू राहणार आहे. पहिल्याच दिवशी आठ इमारती जमीनदोस्त केल्यात आहेत, असे महापालिकेच्या बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता नामदेव गंभीरे यांनी सांगितले
दरम्यान धनकवडी, नरहे,आंबेगाव परिसरात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाना मात्र पालिकेचे प्रशासन अप्रत्यक्ष पणे संरक्षण देत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
महापालिकेत समावेश झालेल्या नव्या गावांमधील बेकायदा बांधकामे पाडण्याला मुहूर्त सापडला असून, या अकरा गावांतील बांधकामांची पाहणी केल्यानंतर आता बेकायदा बांधकामांवर हातोडा उगारण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
जुन्या आणि नव्या बांधकामांवर कारवाई होईल. मिळकतधारकांना नोटिसा दिल्याचे बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी स्पष्ट केले.
महापालिकेत समाविष्ठ नव्या अकरा गावांतही बेकायदा बांधकामे असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यानुसार् लोकांना नोटिसा दिल्या. आता लोहगाव, केशवनगर, येवलेवाडीपाठोसाठ उरुळी देवाची, फुरसुंगी, साडेसतरा नळी, आंबेगाव (बु., खु.) येथील बांधकामे पाडण्याचे नियोजन केले आहे.