पुणे-
पुणे- शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी हा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला.सभेच्या सुरुवातीस सावरकर -गांधी विषयाला तोंड फुटले . मात्र सभेचे अध्यक्ष महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तत्क्षणी श्रधांजली चे विषय घेऊन त्यावर पडदा टाकला . त्यानंतर नव्या सरकारचे अभिनंदन करणारी तहकुबी मांडली गेली.
विशेष म्हणजे यावेळी शिवसेना, काँगेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक भगवे फेटे घालून आले होते. 20 जानेवारी 2020 दुपारी 3 वा. पर्यंत ही सभा तहकूब करण्यात आली. टेबल वाजवून यावेळी आंनद व्यक्त करण्यात आला.
शिवसेना नगरसेवकांनी गळ्यात भगवे उपरने, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गळ्यात राष्ट्रवादीचे उपरने तर, काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या चिन्हाचे गळ्यात उपरने घातले होते. पेढे वाटून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2433862933596208/