‘ती’ व्हिडीओ क्लिप …महापौर दालनात उलगडणार ..(व्हीडीओ)
पुणे- महापालिकेच्या सभागृहात होणाऱ्या मुख्य सभेत .. सुभाष जगताप यांनी आव्हान दिले आणि आयुक्तांनी ते स्वीकारले देखील … पण या दोघांच्या या आव्हान प्रती आव्हानाला अखेर महापौर दालनाचा रस्ता दाखवून ‘वाद ‘ चव्हाट्या वर आणणे टाळण्यात आले .
काल महापालिकेच्या मुख्य सभेत हे घडले . तळजाई वरील प्रकल्पावरून सुभाष जगताप आणि आबा बागुल यांच्यातील वादंग आता पुण्याला परिचित झालेला आहे . तळजाई च्या विकास कामांना अडथला आणतात असा आरोप ठेवत जगताप यांच्यावर महापालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे यात जगताप यांनी ठेकेदार किंवा कर्मचारी यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे .असे विधान मुख्य सभेतच गेल्या वेळी खुद्द आयुक्तांनी केले होते. त्यावर जगताप यांनी दाखवा मी मारहाण केलेली व्हिडीओ क्लिप असे आव्हान आयुक्तांना दिले आणि त्यांनी ते स्वीकारलेही … पण पुढे सभागृहात अशी व्हिडीओ क्लिप नका दाखवू ती महापौर दालनात दाखवा असा निर्णय मुख्य सभेत घेण्यात आला आणि या विषयावर पडदा टाकण्यात आला .
गेल्या अडीच वर्षात महापौर दालन हे झाकल्या मुठीतील वादग्रस्त विषयांचे अनोखे दालन बनले आहे आता जगताप आणि बागुल यांच्यातील वादात सापडलेल्या आयुक्तांचा आणखी एक किस्सा या दालनाच्या बंद मुठ्ठीत झाकून राहिला जावू नये अशीच आशा व्यक्त केली जावू शकणार आहे .