पुणे-अजूनही सार्वजनिक स्वच्छतागृहांची सर्वत्र पुरेसी व्यवस्था करू न शकलेल्या महापालिकेच्या उपायुक्तांना संतापलेल्या उपमहापौरांनी अस्वछ पुण्याचा चेहरा दाखविला . याच उपायुक्तांनी रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्यांना दंड ठोठावून माध्यमातून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती .प्रत्यक्षात स्त्री असो पुरुष असो पुण्यात ये जा करताना सर्वानांच लघुशंका करायची झाली तरी कुठे करावी ? असा प्रश्न वर्षानुवर्षे सतावतो आहे आणि मग पोटफुगी सहन करत कोंडमारा सहन करावा लागतो अशी स्थिती असताना ‘रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्यांना दंड’ याद्वारे प्रसिद्धी त्यांनी मिळवून घेतली होती .
उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मंगळवारी महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्यासमवेत आपल्या प्रभागात फिरून त्यांना स्वच्छतेच्या कामातील अनेक त्रुटी दाखवल्या. असेच काम होत असेल तर मग शहराचा क्रमांक स्पर्धेत शेवटून पहिला आला तर आश्चर्य वाटायला नको अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मोळक यांनी नंतर सर्व क्षेत्रीय कार्यालयांना परिपत्रक पाठवून या त्रुटी त्वरीत दूर करण्याचे आदेश दिले.
गेल्या काही महिन्यांपासून पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत स्पधेर्साठी ही तयारी सुरू आहे. मागील वेळी या स्पर्धेत पालिकेला फटका बसला होता. त्यामुळे यावेळी जय्यत तयारी सुरू आहे. उपमहापौर डॉ. धेंडे यांनी खुद्द मोळक यांनाच आपल्या येरवडा भागातील प्रभागामध्ये विविध गल्लीबोळ फिरून दाखवत काम कसे चालते याचे दर्शन घडवले.
सरकारी वसाहतींमधील कचरा वेळेवर उचलला न जाणे, रस्त्यांची स्वच्छता काळजीपूर्वक होत नसल्याने दोन्ही बाजूंनी कचरा साचणे, रस्त्यांवर ठिकठिकाणी कचºयाचे ढिग दिसणे, मोकळ्या जागांवर सार्वजनिक ठिकाणी फेकलेला कचरा उचलला न जाणे अशा बºयाच गोष्टी या पाहणीमध्ये उपमहापौर व मोळक यांच्या निदर्शनास आल्या. काही ठिकाणी अपेक्षित असलेले कर्मचारीच उपस्थित नव्हते, काहीजण होते पण कामच करत नव्हते असेही त्यांना आढळले.
त्याचबरोबर आरोग्य निरीक्षकांकडून रस्त्यावर कचरा करणाºयांवर काहीही कारवाई केली जात नाही. कार्यक्रमांमध्ये जेवणावळी घातल्या जातात व त्याचे खरकटे रस्त्यावर मोकळ्या जागांवर टाकले जाते, अशा वेळी संबधितांची भेट घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली तर पुढील वेळी अशा गोष्टींना आळा बसेल, मात्र ही कारवाई होतच नाही असे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
मोळक यांनी या सगळ्याची दखल घेत फक्त येरवडाच नाही तर सर्वच क्षेत्रीय कार्यालयांसाठी एक परिपत्रक त्वरीत जारी केले. त्यात त्यांनी या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. तसेच कर्मचारी हजेरी, त्यांचे काम यांची कधीही अचानक तपासणी केली जाईल, कामात कुचराई दिसल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. रस्त्यावर कायमस्वरूपी पडून असलेल्या वाहनांबाबतही अतिक्रमण विरोधी विभागाशी संपर्क साधून या वाहनांवर कारवाई करण्याच्या सुचना मोळक यांनी दिल्या आहेत.