पुणे- महापौरांच्या दालनात अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे -अशा दहशतवादी कृत्याचा निषेध म्हणून महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी उद्या मंगळवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी ‘बंद ‘ पुकारला आहे तर दुसरीकडे कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या ज्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला आहे त्यांच्या कठोर कारवाई ची भूमिका महापौर मुक्ता टिळक यांनी घेतली आहे . दरम्यान अभियंता संघाचे वतीने उदया सकाळी 11,वाजता मनपा हिरवळीवरील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयाजवळ निषेध सभा आयोजित केल्याचे अभियंता संघाने जाहीर केले आहे