कोथरूडमधील कचरा डेपोची सुमारे 28 एकर पाच गुंठे जागेत शिवसृष्टी उभारण्यास मुख्यसभेने मंजुरी दिला आहे. मात्र, राज्य शासनाकडून अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही. त्यातच यावर जागेवर मेट्रोचे टर्मिनसही प्रस्तावित आहे. शिवसृष्टी प्रकल्प हा पालिकेच्या अन्य प्रकल्पासारखा नाही.या मागे देशातील -विदेशातील लाखो नागरिकांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती असलेली भक्ति आणि प्रेम आहे. या शिवसृष्टीत अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती असणार आहेत. त्यासाठी 28 एकर जागेची गरज आहे. शहराचा सर्वागीण विकास होण्यासाठी आणि वाहतूक कोेडी सोडविण्यासाठी पुणे मेट्रोची निंतात गरज आहे. त्यामुळे मेट्रोचे भुयारी स्थनाक करून तिथे शिवसृष्टी उभारावी अशी मागणी या पूर्वी महापौरकडे केली असून त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही दीपक मानकर म्हणाले.
शिवसृष्टी प्रकल्पाबाबात आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहे. गेल्या तीन महिन्यापासून मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन महापालिकेतील सत्ताधारी देत आहेत. मात्र कोणतीही बैठक झालेली नाही त्यामुळे आम्ही 11 फेब्रुवारीला शिवसृष्टीसाठी आंदोलन करणार असल्याचे मानकर यांनी सांगितले.
दरम्यान, आता पुन्हा … उद्या पुणे दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्राशी याबाबत बोलणार असून लवकरच या बाबत तोडगा काढण्यात येईल असे महापौर मुक्ता टिळक यांनी आश्वासन दिले.