महापालिकेच्या अनेक विषयांवर एकमेकांना राजकीय अंगाने धारेवर धरणारे विरोधक मात्र जागा देण्याच्या प्रस्तावावर गप्प बसले होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पीएमपीला जकातनाक्याच्या जागा देण्याचा प्रस्ताव सुद्धा होता. मात्र, पीएमपीला जागा वाणिज्य वापरासाठी देऊच नये यावर मोठ- मोठी भाषणे करणारे काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी याविषयावर मात्र मौन बाळगले. ही जागा पुन्हा मूळ मालकाला गेल्यास पालिकेचे सुमारे 200 ते 300 कोटीचे नुकसान होणार यामध्ये मोठे आर्थिक हितसंबंध जोपासले गेले असल्याची चर्चा पालिकेत आहे. जागा परत देण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून आदेश आले असल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये होती.
सिंहगड रस्त्यावर सर्वे क्रमांक 120 अ आणि 120 ब अशी अडीच एकर जागा आहे. महापालिकेने उच्च न्यायालयाने सात दिवसांपूर्वीच जागा मालकाची याचिका फेटाळली. तर अन्य एक दावा न्यायालयात प्रलंबित असताना सत्ताधारी भाजपने निर्णय घेतला असल्यामुळे अच्छे दिन चा दावा करणाऱ्यांनी पालिकेचे नुकसान केले असल्याची पालिकेत चर्चा होती. अडीच एकर जागा देण्याचा प्रस्ताव आधी स्थायी समितीमध्ये भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक दिलीप बराटे आणि प्रिया गदादे यांनी मांडला होता. कोणतीही चर्चा न करता हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मान्य करण्यात आला. काही नगरसेवकांनी यावर फेरविचार सुद्धा दिला. मात्र, कोणत्याच गटनेत्यांनी यावर मुख्यसभेत आक्षेप घेतला नाही. सभागृहामध्ये नगरसचिवांनी विषय पुकारला यावेळी सर्व सभागृहामध्ये अतिशय शांतता निर्माण झाली. भाजपचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी हा ९५१ क्रमांकाचा विषय पुकारला जाताच ..पुकारला विषय असे नगरसचिव यांना खुणवीत चला पुढच्या विषयाकडे चला असे म्हणताच राष्ट्रवादी चे योगेश ससाणे यांनी मात्र ‘माहिती द्या ‘ अशी मागणी केली . यावेळी सभासदाचाच विषय आहे ,द्या माहिती असे भिमाले म्हणताच … पुढे पहा ..कोण उठले ..कोणाला इशारा केला..आणि कोण कोण योगेश ससाणे यांच्या कडे गेले ..माईक खाली केले .. आणि ससाणे यांच्याबरोबर भैय्या जाधव यांनाही खाली बसविले … पुढे कोणी माहिती दिली नाही ..आणि नगरसचिवांनी देखील ..विषयाचे सोपस्कार पार पाडीत पुढचा विषय पुकारला …
अवघ्या 1 मिनिटाचा हा बोलका व्हिडीओ..पहावा असा .. समजेल त्याला उमजेल असा …