श्री गोपाळ हायस्कूलचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न !
माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सचिन निवंगुणे यांची निवड
पुणे : श्री गोपाळ हायस्कल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी केले होते. 1962 पासूनचे विद्यार्थी या मेळाव्यास उपस्थित होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सचिन निवंगुणे यांची निवड करण्यात आली.
हायस्कूलमध्ये असताना आपल्या वर्गात असलेल्या मित्र-मैत्रिणींना भेटताना सर्वजणच भावूक झाले होते. त्यावेळच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्याने आनंदाचे वातावरण या माजी विद्यार्थी मेळाव्यात होते. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी अशा अनेकजणांची उपस्थिती या मेळाव्याला होती. माजी विद्यार्थ्यांच्या गाठी-भेटी पुन्हा पुन्हा झाल्या पाहिजेत आणि शाळेतील आपले मित्र-मैत्रिणी पुन्हा पुन्हा भेटले पाहिजेत त्यातून सकारात्मक काम झाले पाहिजे म्हणून डॉ. पुष्पा लिमये यांनी श्री गोपाळ हायस्कूल माजी विद्यार्थी संघाची स्थापना केली. या संघाच्या संस्थापक असलेल्या डॉ. पुष्पा लिमये यादेखील यावेळी उपस्थित होत्या.
सर्वांना बरोबर घेऊन शाळेचा आणि माजी विद्यार्थी संघाचा नावलौकिक वाढविण्याचे काम आपण करु, असे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, श्री गोपाळ हायस्कूलचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहेत. सर्वांना एकत्रित आणून सकारात्मक काम उभारणीचे काम करणार आहे.
याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाच्या संस्थापक डॉ. पुष्पा लिमये, अध्यक्ष सचिन निवंगुणे, साहित्यिक बबन पोतदार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विलास लेले व विजय सागर, माजी अध्यक्ष खाजा शेख, सांडु सर, शेलार सर, लोंढे मॅडम, सचिव प्रफुल्ल पठाडे, ज्ञानेश्वर कापडे, नवनाथ सोमसे, ज्योती कोंढे, विनायक हनमघर, संतोष चाकणकर, बाबु सावर्डेकर, कलाकार अनिल नगरकर, खोमणे सर, धायगुडे मॅडम, अविनाश ताकवडे सर, गुजर मॅडम, यज्ञेश्वर धुमाळ, शालिनी फाटक, प्रज्ञा ठोसर, मीरा निंबाळकर, प्रभा वैद्य, सुनीता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.