पुणे: व्यापारी हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे. शहराच्या जडणघडणीमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग मोठा आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी पुणे महापालिका सदैव तत्परतेनं तयार असेल, अशी ग्वाही पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या जाहीर सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेविका छाया मारणे, नगरसेविका हर्षला माथवड, नगरसेविका वासंती जाधव, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, वरिष्ठ उपाध्यक्ष सोमाराम राठोड, उपाध्यक्ष सुनील गेहलोत, सचिव नवनाथ सोमसे, उमेश यादव, रविंद्र सारुक, विजय नरेला, अजित चंगेडिया, मोतिलाल ओझा, दिलीपसिंग राजपुरोहित, कैलास डांगी आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
व्यापारी हा वर्षभर सकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत काम करीत असतो. समाजाला सेवा पुरविणाऱ्या घटकांपैकी व्यापारी हा एक महत्त्वाचा घटक आहे. काम करीत असताना व्यापारी स्वतःच्या कुटुंबाला फारसा वेळ देऊ शकत नाही. म्हणून व्यापारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी संघटनेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार यानिमित्ताने करण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.