दिक्षानिमित्त गुंदेशा परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन
पुणे : होलचंद दानाजी गुंदेशा यांच्या परिवारातील पाच सदस्य जैन धर्माच्या रितीनुसार दिक्षा घेणार आहेत. त्यानिमित्ताने आज पुण्यातील टिंबर मार्केट व भवानी पेठ परिसरातील कामगारांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कृपा ओसवाल, आरती ओसवाल, विर्ती ओसवाल, सचिन ओसवाल, राहुल ओसवाल हे पाच जण येत्या 1 फेब्रुवारी रोजी सूरत येथे दिक्षा घेणार आहेत. दिक्षा घेणारे पाचही जण एकाच कुटुंबातील आहेत, अशी माहिती गुंदेशा परिवारातील दीपक गुंदेशा यांनी दिली. याप्रसंगी जिनंग गुंदेशा, खेमचंद गुंदेशा आदी मान्यवर उपस्थित होते.
दिक्षानिमित्त पुण्यात अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन पहिल्यांदाच होत आहे. कष्टकरी, गोरगरीब व कामगार वर्गाची सेवा यानिमित्ताने करता आली. गुंदेशा परिवाराकडून हा अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला गेला, असे सामाजिक कार्यकर्ते अचल जैन व सतीश शहा यांनी यावेळी सांगितले.