पुणे- कोविड दरम्यान चालणार्या विशेष गाड्यांमध्ये केवळ कन्फर्म आरक्षित तिकिटे असणार्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे आणि वेटिंग तिकिटे असणार्या प्रवाशांना प्रवास करण्यास प्रतिबंध आहे.
पुणे रेल्वे मंडळ रेल्वे स्थानक, गाड्यांमध्ये कोविडशी संबंधित प्रोटोकॉल व उपाययोजनांची पूर्ण अंमलबजावणी करीत आहे व त्यांना अंमलात आणण्यास सातत्याने प्रयासरत आहे.कन्फर्म तिकिटे असणार्या प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या ट्रेनच्या सुटण्याच्या 90 मिनिट आधी स्टेशनवर पोहोचावे जेणेकरून स्टेशनवर कोणत्याही प्रकारची अनावश्यक गर्दी होणार नाही. स्टेशन परिसर आणि प्लॅटफॉर्मवर सामाजिक अंतर पाळण्यात प्रवाशांनी सहकार्य करावे जेणेकरून कोविड चा प्रसार रोखता येईन. सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षणं असल्यास प्रवास करणे टाळावे. प्रवाशांनी स्टेशनवर आणि प्रवासा दरम्यान मास्क घालावे व वारंवार हात धुवावे. प्रवाशांनी कोविडच्या संबंधित इतर राज्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
त्याचबरोबर, रेल्वे प्रशासनाला हे स्पष्ट करायचे आहे की वेटिंग तिकिट असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी नाही आणि सध्या जनरल तिकिटेही दिली जात नाहीत याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. प्रवाशांनी सध्या प्रवाशांच्या सोयी साठी चालू असलेल्या इतर विशेष गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट साठी पर्याय शोधावेत