पुणे- आमदार सुनिल कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्र. क्रमांक २१ कोरेगाव पार्क – घोरपडी – मुंढवा येथील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन “मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक कोरेगाव पार्क” येथे करण्यात आले . ज्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड वाटप, शहरी गरीब योजना कार्ड वाटप, प्रभागातील ८०% पेक्षा जास्त गुण मिळालेल्या १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अश्या विविध समाजउपयोगी कार्यक्रमांचा समावेश होता..
१० वी व १२ वी च्या ६०० विद्यार्थ्यांना ब्लूटूथ स्पीकर वाटप तसेच १५०० नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड देण्यात आले.व १५० नागरिकांना शहरी गरीब योजनेचे कार्ड देण्यात आले. ५० पथारी व्यावसायिकांना छत्रीचे वाटप हि या वेळी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी सामाजिक कार्यकर्ते महेश पुंडे,नारायण सावा,सुशांत निगडे,आशिष सुर्वे,नागराज पिल्ले,रवींद्र खैरे,श्रीराम चौधरी,अजय पाटोळे,जितेंद्र ढवळे,दीप्ती पाटोळे, रवींद्र अलबेला तसेच प्रभागातील पदाधिकारी,जेष्ठ नागरिक,विद्यार्थी, मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते दिनेश गायकवाड यांनी केले होते.