पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबर ते मंगळवार, दि.२२ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान तत्त्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२६ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त होत असलेल्या या सप्ताहात ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे भजन, कीर्तन, प्रवचन यासह लोकप्रबोधनपर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.या सप्ताहाचे उद्घाटन शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.१५ वाजता होणार आहे. या सोहळ्याला ८९ व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. श्री. श्रीपाल सबनीस, आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थचे अध्यक्ष ह.भ.प. मा. श्री. मारुती महाराज कुर्हेकर, प्रसिद्ध संगणकतज्ञ व सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शक पद्मश्री डॉ. विजय भटकर, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, देहू येथील श्री तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री.नितीन महाराज मोरे, श्री क्षेत्र देहू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. स्मिताताई चव्हाण उपस्थित राहाणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यानंतर ज्ञानभूमी आळंदी देहू, महाराष्ट्र ते देवभूमी बद्रिनाथ सरस्वती धाम, उत्तराखंड, भारत या संकल्प सिध्दीच्या निमित्ताने भागवताचार्य बालयोगी ह.भ.प.श्री. हरिहर महाराज दिवेगांवकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
गतवर्ष माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे उत्तराखंडच्या देवभूमीतील भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्या माणा गांवात माता श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान धामाची निर्मिती करण्यात आली. त्याचबरोबर, या गावाजवळील ऐतिहासिक स्वर्गारोहण मार्गावर पाच पांडव अर्थात् धर्मराज युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि महाराणी द्रौपदी यांचे भव्य पुतळे प्रस्थापित करण्यासाठी उत्तराखंड सरकारकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. या सर्व कार्याची पूर्ती आळंदी येथील विश्वरूप दर्शन मंचावर होणार आहे.
‘आळंदी-देहू, महाराष्ट्र ते बद्रिनाथ – सरस्वती धाम’ उत्तराखंड, भारत ह्या संकल्प सिध्दीच्या निमित्ताने कीर्तन, प्रवचन व व्याख्यान या अंतर्गत होणार्या कार्यक्रमात बिहार राज्याचे माजी कायदा व पर्यटन मंत्री मा. श्री. प्रमोद कुमारजी, बनारस हिंदू विद्यापीठाचे मा. श्री. योगेंद्र मिश्रा, माणा गावचे प्रधान, मा. श्री. पितांबर मोलफा, माणा येथील मा. श्री. कुंदनसिंह रावत, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर, या कार्यक्रमासाठी भारताचे माजी उपराष्ट्रपती मा. श्री. व्यंकय्या नायडू, महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा. श्री. भगत सिंह कोश्यारी, उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. पुष्करसिंह धामी, उत्तराखंड राज्याचे पर्यटन मंत्री मा. श्री. सतपाल महाराज यांनाही निमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती’ या स्वामी विवेकानंदांच्या वचनानुसार सुदृढ, निकोप व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याच्या हेतूने सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन केले जाते. बंधुत्व, मानवी हक्क, लोकशाही, सर्वधर्मसमभाव, विज्ञान व अध्यात्माचा समन्वय आणि सहिष्णुता अशा विविध विषयांवरील लोकशिक्षणाचा व समाजप्रबोधनाचा हा सोहळा आहे.
या सोहळ्यात भागवताचार्य बालयोगी ह.भ.प.श्री हरिहर महाराज दिवेगांवकर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच वंशज ह.भ.प.श्री बापूसाहेब मोरे देहूकर, कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर आणि शिव शंभू चरित्र व्याख्याते ह.भ.प.श्री धर्मराज महाराज हांडे यांची ज्ञानभूमी आळंदी ते देवभूमी बद्रिनाथ धाम या संकल्प सिध्दीच्या निमित्ताने दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत कीर्तने होणार आहेत. तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते हरिपाठ व इंद्रायणी मातेची आरती होईल.
दररोज संध्याकाळी ७.१५ ते रात्री ९ या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प श्री अर्जुन महाराज लाड गुरूजी, रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. श्री किसनमहाराज साखरे व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री बाबामहाराज सातारकर यांची सुश्राव्य कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत.
रात्रीच्या सत्रात स्व. पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित उपेंद्रजी भट व रामचंद्र यादव व सहकारी यांचा ‘भक्तिरंग’ हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, विश्वशांती संगीत कला अकादमीचे शिक्षक व विद्यार्थी यांचा ‘विश्वाशंती दर्शन’ हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, पंडित सुधाकर चव्हाण व सौ. शाश्वती चव्हाण यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आणि नवी मुंबईचे श्री. गणेश गोंधळी व सहकारी यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.
संतश्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२६ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मंगळवार, दि.२२ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वा. ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन होऊन त्यानंतर घंटानाद व महाप्रसाद होऊन या सप्ताहाची सांगता होईल.
अशी माहिती श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीचे समन्वयक डॉ. सुनील कराड आणि प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.
श्री क्षेत्र आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन
About the author
SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/