पुणे, दि. २२ : पुणे जिल्हा विधी प्राधिकरण व डीआरटी वकील संघटना यांच्यावतीने २४ डिसेंबर रोजी कर्ज वसुली न्यायाधिकरणाच्या काकडे बिझ आयकॉन पुणे विद्यापीठ मार्ग येथील कार्यालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकन्यायालयाचे उद्घाटन कर्ज वसुली अपिलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष व केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती अशोक मेनन यांच्या हस्ते होणार आहे.
या लोकन्यायालयामध्ये संबंधित पक्षकारांनी सहभाग घेऊन आपले दावे मिटवावे, असे आवाहन कर्ज न्यायाधिकरणाचे रजिस्ट्रार एस.एम. अबुज यांनी केले आहे.