केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी त्वरीत मागे घ्यावी- रमेश बागवे
पुणे- पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र
सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली
आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात
यांच्या सूचनेवरून महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आज हे आंदोलन घेण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘जगभरात लॉकडाऊन असताना
शेतीत मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन केले. कांद्यालाही आता कुठे चांगला भाव येऊ
लागल्याने चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती, पण केंद्रातील मोदीसरकारने
अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. भारतातील कांद्याला
जगभरात मागणी आहे. ती पूरविण्याची भारताची पत आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. मोदी
सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या काद्यांला भाव मिळणार असून स्वत:च्या देशातील
बळीराजावर अन्याय होणार आहे. याची जाणीव पंतप्रधानांना नाही. मुंबईला एक हजार टन
कांदा बंदरामध्ये निर्यातीसाठी उभा आहे. त्याकरीता ही निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी अशी
मागणी करून केंद्र सरकारच्या या अन्यायी निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी
आंदोलन करीत आहे, बाजारात मागील काही दिवसांत कांद्याला चांगला भाव मिळत होता. केंद्र
सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांनाही मोठा
फटका बसला आहे. केंद्रातील मोदीसरकारने तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून कांदा निर्यात बंदी
उठवावी आणि शेतकऱ्यांना चार पैसे जादा कसे मिळतील हे पहावे, असे म्हणाले.’’
यानंतर माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पक्षनेते आबा बागुल, यांची
भाषणे झाली.यावेळी माजी आमदार दिप्ती चवधरी, नगरसेवक अरविंद
शिंदे, बाळासाहेब अमराळे,अविनाश बागवे, संजय बालगुडे,रजनी त्रिभुवन, संगीता तिवारी,गोपाळ तिवारी ,लता राजगुरू, राजेंद्र शिरसाट, विशालमलके, शिलार रतनगिरी, साहिल केदारी, सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, सुनिलघाडगे, , प्रकाश पवार, ॲन्थोनी जेकब, संजय कवडे, शंकर ढावरे,बाळासाहेब बाणखेले, सादिक लुकडे, क्लेमेंट लाजरस, रॉबर्ट डेव्हिड, मुन्नाभाई शेख, रविपाटोळे, अनिल आहेर, आबा जगताप, राधिका मखामले, विठ्ठल गायकवाड, सुरेश राठोड, मीराशिंदे, चेतन आगरवाल, प्रशांत वेलणकर, किशोर वाघेला, सुरेखा खंडागळे, सुजीत यादव, विठ्ठलथोरात, हुसेन शेख, हसन कुरेशी आदींस काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.