पुणे दि २३ –
“प्रजासत्ताक दिना”च्या पुर्व संध्येस… देशातील न्याय व्यवस्थेच्या स्वायत्ततेच्या समर्थनार्थ व रक्षणार्थ मुक निदर्शने, लाक्षणिक आंदोलन करणे बाबत राजीव गांधी स्मारक समितीची नुकतीच बैठक झाली. व सर्वानुमते खालील प्रमाणे “मुकनिदर्शने,सत्याग्रह व नागरी स्वाक्षरी_अभियान” करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष, बैठकीचे निमंत्रक व काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी होते.. या बैठकीस, सर्वश्री ॲड विजय सावंत, ॲड शहीद अख्तर, ॲड संदिप ताम्हणकर, संजय चौगुले, ॲड श्रीकांत पाटील, ॲड फैयाझ शेख, ॲड बाळासाहेब बामणे, ॲड आश्विनी गवारे, ॲड सुरेश नांगरे, ॲड केदार गोराडे, ॲड अजय अनिवसे, ॲड रशीदा शेख, ॲड रेश्मा शिकलगर, ॲड राजश्री अडसुळ, इ सह अनेक जेष्ठ – कनिष्ठ वकील वर्ग, युक्रांद चे संदीप बर्वे इ सह – महीला वर्ग व स्मारक समितीचे सदस्य श्री सुर्यकांत उर्फ (नाना) मारणे, रामचंद्र शेडगे, सुभाष थोरवे, भोला वांजळे, धनंजय भिलारे, पै शंकर शिर्के, विनायक पाटील, संदीप मोरे, आरिफ भाई कांचवाला, सुरेश ऊकीरंडे, रमाकांत शिंदे, ऊदय लेले इ. ऊपस्थित होते..
प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येस..
दि २५ जाने. दु २ ते ६*..
राजीव गांधी स्मारक समिती तर्फे…
*#नागरी #स्वाक्षरी अभियान व #मुकनिदर्शने*
सहभाग –
विधिज्ञ (वकील वर्ग), विविध पक्षीय नेते-कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व पुणेकर नागरीकांचे सहभागाने…
पुणे जिल्हा न्यायालय ईमारती बाहेर, शिवाजी नगर, पुणे ५
गेट क्र ४ चे बाहेर