पुणे : तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढावी यासाठी कार्यरत ‘ऋत्विक फाउंडेशन’च्या वतीने ‘खयाल विमर्श’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (दि. २९ ऑक्टोबर) सायंकाळी ६.०० वाजता कोथरूडमधील ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथील सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम विनामूल्य व सर्वांसाठी खुला आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार, गायक पंडित सत्यशील देशपांडे यांचे बहारदार सादरीकरण ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. खयाल गायनातील तज्ज्ञ असलेले पं. देशपांडे ‘उत्तर भारतीय खयाल संगीताचे स्वरूप : ते कशामुळे अद्वितीय आहे’ यावर बोलणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.