पुणे- राज्य सरकारने प्रत्यक्षात महापालिकेने आसनक्षमतेच्या 50 टक्के उपस्थितित मुख्य सभा घेण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व प्रथम या आदेशाचे स्वागत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.
ते म्हणाले,’ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे महानगरपालिकेतील सर्व सभासदांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पुणे महानगरपालिकेची मुख्यसभा ऑफलाईन पध्द्तीने घेण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. पुणेकरांचे प्रश्न समस्या प्रखरतेने सभागृहात मांडण्यासाठी ऑफलाईन सभा होणे खूप महत्वाचे होते. त्यामुळे याबाबत महापौर यांना सुद्धा आम्ही विनंती केली होती.
यासंबंधीचे महापौर यांचे विनंती पत्र मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री ,नगरविकास मंत्री महोदय यांना पाठवण्यात आले असता. आज सायंकाळी या संबंधी ऑफलाईन मुख्यसभा घेण्याबाबतच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली