महाविकास आघाडीला राज्यभरातून ‘मातंग स्पीक्स’ चे आवाहन
पुणे- विधानपरिषदेत सर्वपक्षांनी सर्व जाती धर्माच्या सदस्यांना संधी मिळावी अशी घटनेत तरतूद असतानाही आजवर मातंग समजाला विधानपरिषदेवर संधी मिळालेली नाही , याकडे लक्ष वेधत आता तरी राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी आज अलका चौकात सर्वपक्षीय मातंग समाजाच्या युवा नेत्यांनी केली आहे . कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे,आरपीआय चे हनुमंत साठे , शिवसेनेचे बाळासाहेब भांडे तसेच अन्य कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध रीतीने निदर्शने करत महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला . ‘मातंग स्पीक्स’ च्या माध्यमातून राज्यभरातील ८ लाख मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी विविध शहरातून महाविकास आघाडी कडे गाऱ्हाणे मांडून लक्ष वेधून घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कॉग्रेस ,भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना ,आरपीआय अशा सर्व पक्षीय मातंग नेत्यांनी पत्रकार परिषेदत या पूर्वीच विधान परिषदेत मातंग समाजाला प्रतिनिधित्व का नाही? असा सवाल उपस्थित करीत कोणत्याही पक्षाचा घ्या पण १ मातंग समाजाचा प्रतिनिधी विधानपरिषदेवर घ्या अशी मागणी केली होती .
१ मे १९६० पासून विधानपरिष देवर नियुक्त्या करताना मातंग समाजाकडे दुर्लक्ष झालेले आहे . आता तरी सरकारने या समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी आज पुन्हा करण्यात आली आहे.