आम्ही कोणाला घाबरलेलो नाही , विघ्नसंतोषीच्या चुकीच्या मेसेज वर विश्वास ठेऊ नका
मुख्यमंत्र्यांचा निरोप २ दिवस थांबा,मी निर्णय देतो -म्हणून स्थगिती
८ एप्रिल रोजी रात्री सव्वा अकरा वाजता केले रांका यांनी आवाहन
पुणे- मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे पीएमसी कमिशनर ,वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही संबधितांनी केलेली विनंती लक्षात घेऊन आज शुक्रवारपासून दुकाने उघडण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने स्थगित केला असून त्या ऐवजी सोमवार पासून महाराष्ट्रातील सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती फेडरेशन चे अध्यक्ष एफ एम रांका यांनी ‘माय मराठी ‘ ला कळविली आहे .मुख्यमंत्र्यांचा निरोप २ दिवस थांबा,मी निर्णय देतो असा असल्याने केवळ शुक्रवारचा १ दिवस थांबून १ दिवसाची स्थगिती आपण मुख्यमंत्र्यांचा मान ठेवून देत आहोत . आम्हाला कोणी धमकी दिलेली नाही , आणि आम्ही कोणाला घाबरलेलो नाही हे स्पष्ट करत रांका यांनी व्यापार्यांचे आंदोलन मोडीस काढण्यासाठी काही कंटकांनी परस्पर मेसेज फिरविणे सुरु केल्याने काल आपल्याला आपल्या १५० व्यापाऱ्यांना फोन आल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर पुण्याच्या महापौरांच्या नावाने ऑडीओ पाठवून दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले गेलेत . त्यामुळे फेडेरेशन च्या अधिकृत मेसेज शिवाय कोणाच्या कसल्याही मेसेज वर विश्वास ठेवू नये असे आवाहन हि त्यांनी केले आहे.