पुणे -मिळकतकर आपल्या दारी येत असून शहरातील १५ क्षेत्रीय आयुक्तांकडे फॉर्मचे वितरण झाले असून लवकरच महापालिकेचे आरोग्य खात्यातील कर्मचारी आपल्याकडे येतील त्यांना सर्व माहिती द्या, मिळकतकर भरा आणि पुणे शहराच्या विकासाला गती द्या असे आवाहन महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केले आहे.
महानगरपालिकेच्या करआकारणी न झालेल्या मिळकतीची माहिती घेणे काल पासून पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यातील नऊ हजार कर्मचाऱ्यांकडून सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी शहरातील १५ क्षेत्रीय आयुक्तांना दिले.
पुणे महानगरपालिकेत गेल्या कित्येक वर्षांमध्ये मिळकतकर न भरणाऱ्या मिळकतीचे असेसमेंट व्हावे. यासाठी सातत्याने आबा बागुल प्रयत्न करीत होते. यासाठी जीआयएस मॅपिंग प्रणालीची देखील महापालिकेने स्थापना केली होती. परंतु जीआयएस मॅपिंगचे काम अर्धवट सोडल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी प्रत्येकाच्या दारोदारी काम करण्यासाठी जात असतात. त्यांच्याकडे फॉर्म देऊन मिळकतकर भरणारे व न भरणाऱ्यांना फॉर्म देऊन माहिती गोळा करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना दिला होता. त्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता देऊन पुणे शहरात असेसमेंट न झालेल्या मिळकतींची माहिती मिळेल व या मिळकती असेसमेंट होतील त्यामुळे महानगरपालिकेला सुमारे ३०० ते ३५० कोटी रुपये प्रतिवर्षी मोठे उत्पन्न मिळेल. महापालिकेला उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत व्हावे यासाठी रेव्हेनु कमिटीची देखील स्थापना करण्यात आली आहे. पुणे शहरात अनेक मोठे प्रकल्प पैश्या अभावी रखडलेले असून त्यातील एचसीएमटीआर हा सगळ्यात मोठा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी उत्पन्न वाढले पाहिजे. या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे असे आबा बागुलांचे मत आहे. ३०० ते ३५० कोटी रुपये दरवर्षी महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली तर एचसीएमटीआर सारखे मोठे प्रकल्प मार्गी लागतील.