पुणे : पुण्याचे नवनियुक्त महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पदभार स्वीकारला. पुण्यात उद्या (सोमवार 13 जुलै) मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरु होणार असल्याने रविवारच्या दिवशीच विक्रम कुमार यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेतला.
शेखर गायकवाड यांची कालच पुणे पालिका आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासात आयुक्त भवनात विक्रम कुमार यांनी गायकवाड यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोरोना शी लढा हे आव्हान त्यांच्या समोर आ वासून उभे आहे , रविवारीच विक्रम कुमार यांनी पदभार स्वीकारुन कामकाजाला सुरुवात केली.
कोरोनाशी लढताना आजवर केलेल्या उपाययोजनांची आणि त्याने झालेल्या परिणामांची कल्पना -यांची माहिती त्यांनी घेतली तेव्हा लॉक डाऊन गरिबांसाठी कोरोनाचा बाप बनला असल्याची, आणि नफेखोरांसाठी वरदान बनला असल्याची कल्पना काहींनी त्यांना दिल्याचे समजते .रोग परवडला पण उपचार नको अशी स्थिती होऊ नये यासाठी घेतलेली काळजी म्हणजे अनलॉक १ होते . रोगाशी लढताना , गनिमी काव्याने जीवन सावरत ,रोगाला हरवत राहावे पण रोगापेक्षा उपचार जालीम ..होऊ नये … अशी भावना त्यांच्याकडे काहींनी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.