पुणे- गेली ३० वर्षे सातत्याने कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन नगरसेवक राहिलेले ,महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष ,उपमहापौर ,गटनेता अशा पदांवर काम केलेले ज्येष्ठ नगरसेवक यांच्या खांद्यावर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा गटनेता पदाची जबाबदारी टाकली आहे.गटनेता होण्यास इच्छुक असलेले अविनाश बागवे यांच्यासह पक्षातील सर्वांना विश्वासात घेऊनच आपण काम करणार असून आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला बळकटी मिळेल अशा स्वरूपाचे आपले काम दिसून येईल असा विश्वास आबा बागुल यांनी ‘माय मराठी’ शी बोलताना दिला .
कॉंग्रेसच्या अरविंद शिंदे यांनी आपली गटनेता पदाची कारकीर्द जोरदारपणे गाजविली .माय मराठी च्या मदतीने त्यांनी, अविनाश बागवे यांनी आणि राष्ट्रवादीच्या तत्कालीन नेत्याने महापालिकेत वावरणाऱ्या बोगस कामगाराचा पर्दा फाश करण्यात महत्वाची भूमिका राबविली अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे वेळीच बाहेर काढून त्यास पायबंद घालून महापालिकेचे करोडो रुपये वाचविण्यात यश मिळविले .याच कामाच्या जोरावर कसबा विधानसभा मतदार संघात शिंदे यांना विधानसभा लढविण्याची संधी महापालिकेने दिली . दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला . तसाच पर्वती मतदार संघात आबा बागुल यांनाच उमेदवारी द्यायचा पक्षाचा निर्णय होता पण दुर्दैवाने हा मतदार संघ वाटपात राष्ट्रवादीकडे गेला आणि आमदार व्हायचे आबांचे स्वप्न अधुरेच राहिले . त्यानंतर बागुल हे शहर कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी रेस मध्ये होते .परंतु शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष बागवे यांचे धडाकेबाज काम पाहता त्यांना बदलून त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होते .या पार्श्वभूमीवर आता पुन्हा गटनेता म्हणून आबांना एकीकडे संधी देत तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी या अनुषंगाने सोपविण्यात आली आहे. गटनेते आणि त्यांचे गॅटमॅट पक्षनेता बैठकीत होत असल्याची कायम चर्चा राहिली आहे . आबा बागुल यांच्या कारकिर्दीत ती होणार नाही असा दावा हि आता करण्यात येतो आहे. बागुल यांना गटनेता पदावर संधी मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत आता जोरदार उत्साह आहे.