पुणे- पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक २९६ अ- कात्रज ते वांगणीवाडी हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी पुण्याच्या माजी उपमहापौर . सरस्वतीताई शेंडगे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी श्री. सतिश गाटे, कात्रज आगार व्यवस्थापक श्री. विजय रांजणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्ग क्रमांक २९६ अ – कात्रज ते वांगणीवाडी या बस सेवेचा मार्ग कात्रज, शिंदेवाडी, वेळू, शिवापुर, वरवे, केळवडे, चेलाडी फाटा, नसरापूर गाव, माळेगाव, वीरवाडी जांभळी, कुरुंगवडी फाटा, आंबवणे, करंजवणे, मांगदरी, निगडे, वांगणी गाव, वांगणीवाडी असा असणार आहे.
याप्रसंगी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पीएमपीएमएलने पुणे शहरालगतच्या
तालुक्यांमधील गावांमध्ये जिथे मागणी होईल तिथे नवीन बसमार्ग सुरू केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा देखील सार्वजनिक वाहतूक सेवेचा प्रश्न कायमचा दूर होणार आहे.”
कात्रज ते वांगणीवाडी या नवीन बस मार्गामुळे या मार्गावरील शेतकरी, दूध व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी या सर्वांनाच शहरात ये-जा करणे सोयीचे होणार असून पीएमपीएमएलने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे माध्यम उपलब्ध करून दिल्याने कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला व पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.