पुणे :-कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने
नाना पेठेतील ६५० गरीब व गरजू कुटुंबासाठी “नवरंग युवक मित्र मंडळ” तर्फे मोफत धान्य
(किट) वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता .मंडळाचे अध्यक्ष अनुपम अशोक वंगारी यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. नाना पेठेत रोजच्या दैनंदिन हातावर पोट असणारे अनेक मजूर, विडी कामगार व इतर कामगार राहतात. लॉकडाऊन च्या काळात सर्व कामे बंद असल्याने त्यांचे हाल होत आहे.यातच सामाजिक बांधीलकी म्हणून या लोकांना आधार म्हणून आमच्या मंडळातर्फे किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.असे अनुपम वंगारी यांनी यावेळी बोलताना सांगीतले.
या वेळी सुधाकर झाडगे, सुनील देवघरे, संजय इरमल, ओमकार बांदल, राकेश बहीरट, अनिकेश व्हावळ, निलेश माकुडे, अजय गुन्नाल, शुभम सांभार, आकाश सापा, ललित वंगारी, विश्वास मणेरे, संजय इंजापुरी, सुरजशेठ मिटकरी अमन दारूवाला, संदीप येल्दी, प्रदीप शेरे, विशाल कोंका, राज कोळी, ऋषिकेश चिन्नी, राहुल बांदल, जफरभाई कच्छी, नितीन आडेप इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.